राळेगणसिद्धी
२५ ऑक्टोबर २०११
माझ्या भगिनींनो आणि बांधवांनो ,
नमस्कार.
‘जनलोकपाल’ बिलाच्या कायद्यासाठी देशभरातून आपण सर्व बंधू-भगिनी सहभागी झालात. आपणा सर्वांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. अमावस्येच्या काळ्या-कुट्ट अशा अंधाऱ्या रात्री दिप प्रज्वलित करून आपण सर्वांनाच प्रकाश प्राप्त करून देत आहात. मात्र अजुनही भ्रष्टाचारामुळे असंख्य माणसांच्या अंत:करणातील अंध:कार घालविण्यासाठी आपण सर्व जण प्रयत्न करू या.
ज्या दिवशी ‘जनलोकपाल’ बिलाचा कायदा होईल, त्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने दिपावली साजरी करूया. ती दिपावली माणसांच्या अंतर्बाह्याला प्रकाश देणारी दिपावली असेल. सालाबाद प्रमाणे ही दिपावली साजरी करीत असताना ती प्रकाशमय दिपावली साजरी करण्याचा प्रयत्न करूया.
या दिपावली मध्ये जी माणसे आरोप-प्रत्यारोपांचे फटाकडे वाजवित आहेत, त्या दिपावलीच्या दिवशी त्यांची तोंडे बंद झालेली असतील आणि आपल्या दिपावलीच्या सणामध्ये तेही सहभागी झालेले असतील.
पुन्हा एकदा सर्व देश बांधवांना दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !
धन्यवाद
कि. बा. हजारे (अण्णा)