माझ्या भगिनींनो आणि बांधवांनो ,
नमस्कार.
‘इंडियन एक्सप्रेस’ने (आतिक रशीद) माझ्या ब्लॉगबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करून “माझ्या ब्लॉगबद्दल मला कसे वाटते.” अशी विचारणा केली त्याबद्दल त्यांचे धन्यवाद.
आज माहिती-तंत्रज्ञानाने जगामध्ये आश्चर्यकारक प्रगति केली आहे. सर्व जगभर माहिती-तंत्रज्ञानाच्या स्पर्धा सुरु झालेल्या आहेत. दररोज आश्चर्य वाटावे अशी प्रगती होत आहे. त्यामध्ये भारतही मागे नाही हीं अभिमानाची गोष्ट आहे. मी गांधीजींच्या विचारसरणीचा पुरस्कर्ता असलो तरीही आजचे माहिती आणि तंत्रज्ञान महात्मा गांधीजींच्या वेळेला असते तर त्यांनीही या तंत्रज्ञानाचा नक्कीच उपयोग करून घेतला असता, असं मला वाटते. कारण या तंत्रज्ञानामुळे माणसांच्या जीवनातील प्रत्येक क्षण हा महत्त्वाचा असतो. त्या वेळेची बचत होते.
महात्मा गांधीजी म्हणत असतं की निसर्ग आणि मानवतेचे शोषण न करता केलेला विकास हा शाश्वत विकास असतो तर वस्तूंचे शोषण करून जो विकास होतो तो योग्य नाही.
या (माहिती) तंत्रज्ञानामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांवर होणारा खर्च वाचला आहे. त्याचप्रमाणे प्रदुषण न करता विकास होत आहे, ही महत्त्वाची बाब आहे. या तंत्रज्ञानामुळे जग फार जवळ आले आहे. आता माणसे जवळ कशी येतील असा प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्यासाठी महात्मा गांधीजींच्या विचाराला या टेक्नोलोजीची जोड दिली, तर दोन्ही गोष्टी साध्य होतील, असं मला वाटते.
जेव्हा माझ्या ब्लॉगवरहीं माझ्या विचारांचे कोटी कोटी लोक थेट वाचन करतात तेव्हा हा तंत्रज्ञानाचाच प्रभाव आहे असं मला वाटते.
(सावल्या , माझ्या उजव्या बाजूला सुरेश पठारे आणि डाव्या बाजूला दादा पठारे)
जय हिंद! वन्दे मातरम! भारत माता की जय!
You must be logged in to post a comment.