माझ्या भगिनींनो आणि बांधवांनो ,
नमस्कार.
राजकीय क्षेत्रामध्ये माझ्या आंदोलनासंबंधाने उलट-सुलट चर्चा होत असतात.
त्यांकडे मी विशेष लक्ष देत नाही.
अपमान पचवण्याची शक्ती असल्याशिवाय कार्यकर्त्याला समाज आणि देशासाठी भरीव कार्य करता येत नाही हा इतिहास आहे. कारण ज्या झाडांना फळे लागतात त्याच झाडांना लोक दगड मारत असतात. ज्या झाडांना फळेच नाही अशा झाडाला दगड मारायचा प्रश्नच येत नाही.
मी माझ्या मनाला साक्ष ठेवून वाटचाल करीत असतो, कोण काय म्हणतो इकडे पाहत नाही.
फक्त सत्याच्या मार्गाने चालत रहावं कारण सत्य हे नेहमी सत्य असते.
सत्याला कोणी ही खोटे करू शकलेले नाही.
सत्याच्या मार्गावर अडचणी खुप येतात,त्रासही खुप होतो, मात्र सत्य कधी पराजित झालेलं नाही, हा इतिहास आहे.
मी गेले तीस वर्षे राजकीय हेवे-दाव्यांसंबंधी उलट-सुलट चर्चा ऐकतो आहे.
मात्र मनाला कधी थकवा आलेला नाही.
कि.बा.हजारे (अण्णा)
You must be logged in to post a comment.