राळेगण सिद्धी .
१७ ऑक्टोबर २०११
‘हिस्सार’ ची लोकसभेच्या पोट-निवडणुकीची जागा कॉंग्रेस हरली आहे. आता कॉंग्रेसने ‘टीम अण्णा’ला दोष न देता येणाऱ्या अधिवेशानामध्ये भ्रष्टाचारासंबंधाने कठोर कायदे करणे आवश्यक आहे. कारण भ्रष्टाचारामुळे सामान्य माणसांना जीवन जगणे अशक्य झालेलं आहे. जनतेची सहन करण्याची कार्यक्षमता कमी झालेली असल्याने जनतेने कॉंग्रेसला नाकारले आहे.
कॉंग्रेसने या निवडणुकीचा धडा घेतला नाही तर देशात अशीच अवस्था होईल म्हणून वेळीच जागृत होवून हिवाळी अधिवेशानामध्ये ‘जनलोकपाल’ बिलाचा कठोर कायदा करावा अन्यथा हिस्सार मध्ये तर फक्त ‘टीम अण्णा’चे कार्यकर्ते प्रचारासाठी गेले होते. आता विधानसभा निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष अण्णा हजारेंनाच प्रचारासाठी जावे लागेल. समाज आणि देशाच्या हितासाठी तसं करणं आवश्यक आहे, अस मला वाटतं.
‘टीम अण्णा’बद्दल ही काही लोक उलट-सुलट चर्चा करतात. टीम ला फोडण्याचा प्रयत्न करतात. मात्र त्याचा काही परिणाम होणार नाही. ‘टीम अण्णा’ एकत्रच राहील व ‘जनलोकपाल’ बिलासाठी सतत प्रयत्नशील राहील.
कि बा. हजारे